Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Matam By Suhas Shirvalkar
Rs. 810.00Rs. 900.00

*अहमदनगरची निजामशाही*

*लेखक :*
*कॅप्टन डॉक्टर भगवान गणेश कुंटे*
बहामनी राजवटीचा अस्त झाल्यावर त्यातून ज्या पाच राजवटी दक्खन मध्ये उदयाला आल्या. त्यातील एक भक्कम राजवट म्हणजे "निजामशाही"!

इसवी सन १४९० रोजी मलिक अहमद म्हणजेच निजाम-उल-मुल्काने झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. विजय मिळवून देणारा प्रदेश म्हणून त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे "अहमदनगर" असे नामकरण केले.

पुढे प्रत्येक राजाने स्वतःला "निजामशहा" हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. म्हणूनच ही राजवट पुढे "अहमदनगर ची निजामशाही" म्हणून इतिहासात प्रसिद्ध पावली.
मलिक अहमद निजामशहा याने या शहराच्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहमदनगरमध्ये अंडाकृती किल्ला बांधला.अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे.त्यांनी ही राजवट जवळपास १४० वर्षे अहमदनगर येथून राज्य करून चालविली.

अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. छत्रपती शिवारायांच्या स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण वेरूळ च्या भोसले घराण्यातील मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केले.स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत होत.

निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली.
शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले.तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते.

अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडण करण्यात निजामशाही च्या प्रचंड मोठा वाटा आहे. किंबहुना निजामशाही चा उल्लेख केल्याशिवाय "अहमदनगर" या शहराचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही ,असे म्हंटल्यास त्यात अजिबात वावगे नाहीय.

*बहामनी राज्याचा इतिहास*

*लेखक :*
*कॅप्टन डॉक्टर भगवान गणेश कुंटे*
बहामनी राज्य- १४ व्या शतकात दक्षिण भारताच्या इतिहासात अस्तित्वात आलेली एक स्वतंत्र इस्लामी राजवट. दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राजवट जवळपास एकाच वेळेला उदयाला आली. अल्ला‍उद्दीन हसन बहामनी उर्फ हसनगंगू याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली.

हसन गंगू बहामनी यांना स्थापन केलेली बहामनी राजवट हे दक्षिणेतील महत्त्वाची दखनी राजवट होती. यांची प्रमुख ठाणी बीदर आणि गुलबर्गा इथे होती.बहामनी राजवटीच्या एकूण १८ सुलतानांनी तब्बल २०० वर्षे यांनी दक्खन च्या राजकारणात आपली पकड मजबूत केलेली होती.बहामनी राजवटीत कला आणि साहित्याचा वारसा निर्माण झाला. तोच वारसा पुढे मुघलांनी चालवला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
बहामनी राजवट उत्तरेत विंध्य ते दक्षिणेत तुंगभद्रा पर्यंत पसरलेले होते.बहामनी राजवटीचा हिंदू राज्याच्या वारंगल आणि विजयनगर साम्राज्याशी नेहमीच संघर्ष होत असे.

इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वऱ्हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.
अश्या प्रकारे १६ व्या शतकाच्या उदयाआधी या राजवटीचे ५ तुकडे पडून १५२७ ला या राजवटीचा अंत झाला.

---------------------------------------------

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:
Translation missing: en.general.search.loading