Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Durvancha Ras | दुर्वांचा रस  by   AUTHOR :- Suresh Nagarsekar
Rs. 45.00Rs. 50.00
अमेरिकेच्या डॉ. अॅन विग्मोर यांनी अखंड संशोधनाने गव्हाच्या रोपांचा उपचार शोधून काढला आणि त्याचा प्रसार जगभर केला. गव्हाच्या रोपातील क्लोरोफिल हे रोगमुक्तीसाठी किती उपयुक्त आहे, याचा अनुभव त्यांनी साऱ्या जगाला दिला. अमेरिकेतील बोस्टन येथील त्यांच्या रुग्णालयात जगभरातील नामवंतांनी राहून आणि असा उपचार घेऊन रोगमुक्ती मिळवली. यात आघाडीच्या अभिनेत्री-अभिनेत्यांपासून ते शास्त्रज्ञ-राजकारण्यांपर्यंत सारेच होते. गव्हाच्या रोपाच्या खालोखाल दुर्वांच्या रसामध्ये हे क्लोरोफिल मोठ्या प्रमाणात सापडते. म्हणून गव्हाच्या रोपाच्या रसाच्या उपचाराला दुर्वांच्या रसांचा उपचार पर्याय होत आहे.
गव्हाच्या रोपाच्या रसाच्या उपचारात गव्हाची सात दिवस वाढलेली रोपे तयार करावी लागतात. दररोज रोपे तयार करावी लागतात. हा खटाटोप प्रत्येक रुग्णास व त्यांच्या नातेवाइकांस जमतोच असे नाही. एकूण आर्थिकदृष्ट्यासुद्धा दुर्वांच्या रसाचा उपचार परवडणारा आहे. म्हणून गव्हाच्या रोपाच्या रसाच्या चिकित्सेवर लिहिण्यापूर्वी दुर्वांच्या रसाच्या उपचारांची सुलभ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी या पुस्तकाचा जन्म झाला आहे.
गव्हाच्या रोपाच्या रसाची चिकित्सा (Wheat grass juice therapy) डॉ. अॅन विग्मोर यांच्यामुळेच जगभर पसरली. तशीच दुर्वांच्या रसाच्या उपचाराची पद्धत (Durva grass juice therapy) जगभर पसरण्याची गरज आहे. दुर्वा या वनस्पतीला भारतीय अध्यात्मात महत्त्व आहेच; परंतु आयुर्वेदातही फार महत्त्व आहे. या आधुनिक युगात दुर्वांमधील क्लोरोफिलचा शोध लागल्यामुळे दुर्वांच्या रसाच्या चिकित्सेला निसर्गोपचारातही महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व जो लक्षात घेईल त्याला रोग निवारण्याची गुरुकिल्लीच हाती मिळेल, यात शंका नाही.
– डॉ. सुरेश नगर्सेकर
Translation missing: en.general.search.loading