हे पुस्तक म्हणजे द. दि. पुंडे यांनी शालेय वयोगटातल्या मुलामुलींशी हसतखेळत केलेला एक शब्दसंवादच आहे. खेळकर शैलीत, अनेकदा नर्म विनोदाचा आश्रय घेत केलेलं मराठी शब्दांविषयीचं हे लेखन मुलांचं शब्दविषयक कुतूहल जागृत करणारं आहे; त्यांच्या मनात भाषेविषयी आपुलकी, प्रेम निर्माण करणारं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांना शब्दांसंबंधी विचार करण्याची सवय लावणारंही आहे. आणखी गमतीची गोष्ट म्हणजे मुलामुलींसाठी केलेलं हे शब्दचिंतन प्रौढ वाचकांचंही तितकंच रंजन व उद्बोधन करणारं आहे. हे पुस्तक वाचताना सर्वांनाच जाणवत राहील, की आपली मराठी भाषा हीच एक मोठी गंमतगोष्ट आहे.