Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Gaonkhori गावखोरी by Ashok Pawar अशोक पवार
Rs. 338.00Rs. 375.00

Gaonkhori गावखोरी by Ashok Pawar अशोक पवार

‘पडझड’, ‘इळनमाळ’ आणि ‘बिराड’ या भटक्या समाजजीवनावरील पुस्तकांनी लेखक म्हणून नावारूपाला आलेल्या अशोक पवार यांची ‘गावखोरी’ ही नवी कादंबरी. या कादंबरीत सुशिक्षित तरुण नायकाच्या संघर्षाच्या प्रवासाबरोबर बेलदार समाजाच्या व्यथावेदनांचा चित्रफलक आहे. तो सुखद आणि शांतविणारा नाही. तर तो कमालीचा दुःखद आणि अस्वस्थ करणारा आहे. बेलदार समाजातील ‘आज’च्या प्रश्नांची मांडणी करणारी ही कादंबरी आहे. त्यामुळे ती अनेकमुखी झाली आहे. जातसमूहाच्या वास्तववादी कादंबरीपरंपरेशी या कादंबरीचे नाते आहे. कादंबरीतील ‘जेलऱ्या दगडू पवार’च्या मुख्य कहाणीला गुंफणाऱ्या उपकथानकांबरोबर अनेक समाजसंदर्भ आहेत. नायकाच्या संघर्षाचा आणि पडझडीचा हा जसा शिक्षणप्रवास आहे, तसाच तो जेलऱ्या-शबानाच्या अपयशी प्रेमकहाणीबरोबर जेलऱ्या-पारुच्या शोकांत लग्नकथेचा आणि बेलदार समाजाच्या व्यथाकहाणींचा हा पट आहे. बेलदार समाजाच्या पराकोटीच्या अभावग्रस्ततेचे आणि दारिद्र्य दुःखाची, प्रस्थापित समाजाच्या नाडवणूकीची, आज इथे तर उद्या तिथे अशा फिरस्त्या पालसंस्कृतीची हृदय हेलावणारी करूण चित्रे या कादंबरीत आहेत. त्याचबरोबर बेलदार समाजातील स्त्री शोषणाची अस्वस्थ अशी गडदचित्रे आहेत. जी दुःखद आणि मन विषण्ण करणारी आहेत. या कादंबरीत दोन दशकातील समता चळवळीबरोबर संविधानमूल्यांच्या चर्चेचे, जातीय-धार्मिक- अस्मिता रंगांचे विविध ‘आवाज’ ध्वनीत झाले आहेत. आत्मपर आणि संवादशैलीतून घडविलेले हे भटक्या समाजाचे शोकांतकथन आहे. ‘हे स्वातंत्र्य कोणत्या हरामखोरांनी गाभडवलं रे’ असा प्रश्न उपस्थित करणारी ही मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.
– प्रा. रणधीर शिंदे

Categories:
Translation missing: en.general.search.loading