'गावशिवार' या पुस्तकातील ललित लेखांचा आशय मुख्यत: माणसाच्या जाणिवांशी जोडलेला आहे. गाव, माती, शिवार, निसर्ग, सृष्टी, ऋतु प्राणी, पक्षी आणि त्यांच्यासोबत माणसाचं जगणं आविष्कृत करणारे हे सर्व लेख आहेत.
संवेदनशीलता हा या सर्व लेखनाला व्यापून असणारा महत्वाचा घटक आहे. हाडामांसाची माणसे ही या सर्व लेखनात आहेत. अशा माणसांची कहाणी लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेली आहे.
लेखकाची भाषाशैली सहज आणि प्रवाही आहे. माणसाने माणसाशी गूज करावे, अशा शैलीतील हे लेख आहेत.