Your cart is empty now.
आजच्या धकाधकीच्या जगात आनंद हरवत चालला आहे. याचं मुख्य कारण आहे,‘'परावलंबन.' कधी आपल्याला वाटतं परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर आपण आनंदी होऊ, तर कधी वाटतं प्रमोशन झाल्यावरच आपण आनंदी होऊ. पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, लौकिक यश, सुखसुविधा, मधुर नाती यांवरच आपला आनंद अवलंबून असतो, पण या गोष्टी प्राप्त झाल्यावरही माणसाच्या आयुष्यात त्याला एक पोकळी जाणवते. काय असतो बरं आनंदाचा अचूक पासवर्ड? प्रस्तुत पुस्तकात राजयोगिनी शिवानी हाच रहस्यभेद करत आहेत.
Added to cart successfully!