Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Samidha By Ranjeet Desai
Rs. 90.00Rs. 100.00
लघुनिबंध हा ललित वाङ्मयाचा अत्यंत आधुनिक असा प्रकार आहे. या नव्या वाङ्मयप्रकाराची दोन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत: स्वैर कल्पनाविलास आणि साध्या विषयातून मोठा आशय शोधून काढण्याची शक्ती ! चमत्कृती हाही लघुनिबंधाचा एक विशेष आहे. ही चमत्कृती बहुधा विषयाच्या निवडीत असते; कधी ती मांडणीत असते, कधी कल्पनेची असते, कधी भावनेची, तर कधी सूचित केलेल्या तत्त्वाची असते. मानवी जीवनाचं जिव्हाळ्यानं केलेलं चिंतन व त्यातून स्फुरलेला तात्त्विक विचारविलास हा या अशा लेखनाचा आत्मा असतो. परंपरा, बहुमत, लघुकथा या संज्ञेशी असलेलं साम्य आणि केवळ लालित्य अथवा मर्यादित आत्मपरता यांच्यावरच भर न देता, कल्पना, भावना आणि विचार यांचा या वाङ्मयप्रकारात आपल्या व्यक्तित्वाचा स्वच्छंद विलास दाखवण्यासाठी, मधुर व मनमोकळ्या आविष्कारासाठी मिळणारा अवसर या सर्व दृष्टींनी या प्रकाराला लघुनिबंध हे नाव अधिकच अन्वर्थक ठरलं आहे. मोहक व्यक्तित्वाचा मार्मिक व मनोहर आविष्कार असणाNया लघुनिबंध या वाङ्मयप्रकाराशी ओळख होऊन, त्याच्याशी जवळीक निर्माण होण्यासाठी चौदा निवडक लघुनिबंधांचा सिद्ध केलेला हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल, असा आहे.
Translation missing: en.general.search.loading