Your cart is empty now.
पंढरीच्या वारीचे चित्रमयी दर्शन
पंढरीची पायी वारी प्रत्येकाची वेगवेगळी असते. वारकरी आपल्याला आत्मिक आनंद मिळावा, यासाठी संतांच्या संगतीने हरिनाम करीत वारी करतात. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तत्त्व जगणाऱ्या वारीत प्रत्येकजण निरनिराळ्या उद्देशाने वारीकडे पाहतो. त्यामध्ये स्वार्थापेक्षा आनंद आणि सेवाभाव हा भाग महत्त्वाचा असतो. जशी व्यावसायिकांची वारी, पोलिसांची वारी, अधिकाऱ्यांची वारी, पत्रकारांची वारी असते. त्याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून छायाचित्रकारांची वारी सुरू झाली आहे. वारीतील वेगळी छायाचित्र काढल्यानंतर स्वतःला मिळणाऱ्या आनंदाबरोबर ती वारी छायाचित्राच्या रूपाने घरी बसलेल्यांपर्यंत पोचविण्याचा आनंद काही निराळाच. सध्याच्या आधुनिकतेच्या काळात वारीनेही आपले रुप बदलले आहे.जगाप्रमाणे वारीही मागे राहिली नाही. तीही टेक्नोसॅव्ही झाली आहे. त्यासाठी, वारीतील छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. ‘इंद्रायणी ते चंद्रभागा-आनंदवारी’ या पंढरीच्या वारीवर आधारित विशेष पुस्तकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रम, रिंगण सोहळे, धावा, नीरा स्नान यासह दरवर्षी घडणाऱ्या घटनांची छायाचित्रे आहेत. तसेच छायाचित्रकारांनी त्यांच्या नजरेने टिपलेली वारीची अनेकविध रूपे या पुस्तकात पाहायला मिळणार आहेत. हे पुस्तक म्हणजे पंढरीच्या वारीचे छायाचित्ररुपी दर्शनच आहे.
Added to cart successfully!