Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shriman yogi By Ranjeet Desai
Rs. 90.00Rs. 100.00
रूपककथा हा साहित्यप्रकार काव्याशी फार मिळताजुळता आहे. थोड्या, परंतु लयबद्ध शब्दांनी वातावरण उत्पन्न करायचे, वेचक पण चमत्कृतिजनक अशा कल्पनांनी सौंदर्य खुल्वयाचे आणि हे साधीत असतानाच विचार आणि भावना यांना आवाहन करून वाचकाला खऱ्याखुऱ्या जीवनाचा व जीवनमूल्यांचा साक्षात्कार उत्कटतेने घडवायचा, हा रूपककथेमागचा मूलस्रोत असतो. .... आतापर्यंत मी जवळ जवळ चाळीस रूपककथा लिहिल्या असतील. निरनिराळ्या दृष्टींनी वाचनीय वाटणाया त्यांतल्या काही निवडक कथांचा हा संग्रह. या सायाच कथा अगदी माझ्या मनासारख्या उतरल्या आहेत, असे नाही; मुल कल्पना आकर्षक असली, तरी तिचे सुंदर रूपककथेत रूपांतर करणे हे काम सकृद्दर्शनी दिसते, तितके सोपे नाही. हस्तिदंताचा छोटा ताजमहाल करायला काही काम कमी कौशल्य लागते का? नाट्यछटा, व्यक्तिचित्र, लघुनिबंध यांच्यासारखाच रूपककथा हा आकाराने लहान, पण रंगत साधायला अवघड असा वाद्न्मयप्रकार आहे; आणि तो साहित्याच्या सौंदर्यात आणि सामर्थ्यात नि:संशयपणे मौलिक भर घालीत असतो. माझ्या वाचकांना या रूपकंकथा निश्चितपणे आवडतील, असा मला विश्वास वाटतो.
Translation missing: en.general.search.loading