Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Kan Ani Kshan (कण आणि क्षण) By S V Kale
Rs. 90.00Rs. 100.00
मराठी साहित्याच्या क्षेत्रात श्रीयुत श्री. वा. काळे यांनी आपल्या पृथगात्म लेखनशैलीने एक वैशिष्ट- पूर्ण स्थान संपादन केले आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक व कौटुंबिक विषयांवर ते विचार प्रवर्तक ललित लेखन करीत आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकांच्या द्वारा वाचकांना संसारा- तील सुखी जीवनाच्या पाऊलवाटा दाखविल्या असून घरी प्राणि समाजात कसे वागावे व यशस्वी व्हावे याचे उद्बोधक मार्गदर्शन केले आहे. गेल्या चाळीस वर्षात श्री. काळे यांनी निदान पाच सहाशे ललित लेख लिहिले असतील. आज ते ऐंशीच्या घरात आहेत. त्यांचा जन्म ५ मार्च १९१० रोजी झाला. फर्ग्युसन कॉलेजातून १९३० साली बी. ए. झाल्यावर त्यांनी अर्थशास्त्रास वाहून घेतले व त्या विषयावर ग्रंथ रचना केली अर्थ साप्ताहिकाचे ते लेखक, संपादक व व्यवस्थापक झाले व १९७५ पर्यंत त्यांनी हे साप्ताहिक चालविले. १९४० साली सांगलीच्या इंजिनियरिंग कॉलेजात अर्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले. पुढे 'भगिनी' मासिकाशी त्यांचा संबंध आला व त्या मासि काव्या निमित्ताने त्यांनी सामाजिक व कौटुंबिक विषयावर स्फुट लेखन करण्यास सुरवात केली. अजूनही त्याचे हे वशिष्टपूर्ण लेखनकार्य अखडित- पणे चालू आहे, श्री. काळे यांचे जीवन बहुविध आहे. ते उत्कृष्ट टेनिसपटू असून 'फाइल क्लब ' नावाची एक श्रीयुत श्री. वा. काळे सांस्कृतिक संस्था स्थापन करून त्यांनी अनेक वर्षे चालविली. मुंबई-पुण्याच्या रेडिओवर त्यांचे असंख्य कार्यक्रम झाले असून त्यांच्या आकाशभाषितांची संख्या सुमारे तीनचारशे होईल, त्यांनी एका जपानी विद्यार्थिनीला मराठीचे इंग्रजी शिकण्यास साहय केले आहे व त्यांच्या प्रेरणेने तिने 'श्यामच्या आई'चे जपानी भाषांतर प्रसिद्ध केले आहे, अलीकडे दिल्लीच्या रिफॅसिमेंटो ऑर्गनायझेशन या संस्थेने विशिष्ट समाजकार्य करणाऱ्या आशियातील नामांकित व्यक्तींचा एक चरित्रकोश तयार केला आहे त्यात श्री. काळ यांचा अंतर्भाव आहे. श्री. काळे यांचा हा वैशिष्ठपूर्ण गौरव कोणा मराठी भाषिकाला अभिमानास्पद वाटणार नाही ?
Translation missing: en.general.search.loading