Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Karl Marx : Vyakti Aani Vichar | कार्ल मार्क्स : व्यक्ती आणि विचार Author: Vishwas Patil |विश्वास पाटील
Rs. 383.00Rs. 425.00

मार्क्सने समाजासंबंधीच्या विचारांच्या इतिहासात अत्यंत अकस्मातपणे एक गुणात्मक बदल घडविला, हे मार्क्सचं महत्त्व. इतिहासाची गती समजून घेऊन तो इतिहासाचा अन्वयार्थ लावतो, भविष्याचं सूचन करतो आणि त्याशिवाय एक क्रांतिकारी विचार मांडतो, तो म्हणजे जगाचा नुसता अन्वयार्थ लावणं पुरेसं नाही तरजग बदलण्याचे प्रयत्नही झाले पाहिजेत.

- चे गव्हेरा


मार्क्सचे चरित्र, व्यि.तमत्त्व आणि एकूणच त्याचे विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

मिखाईल बाकुनिन याने मार्क्सची घेतलेली परखड मुलाखत म्हणजे मार्क्सची घेतलेली उलट तपासणीच आहे. ही मुलाखत म्हणजे संवाद आणि विसंवादाचा एकत्र आविष्कार आहे. मार्क्सचे महत्त्व विषद करतानाच मार्क्स आणि मार्क्सवादाची बौद्धिक चर्चा येथे अनुभवता येते. मार्क्सभक्तांना जाचक वाटणार्‍या काही लेखांतून ही चर्चा अधिक प्रगल्भ झाली आहे. हेच ह्या पुस्तकाचे वेगळेपण आहे. सामाजिक क्रांतीचा व स्थित्यंतराचा इतिहास जाणून घेताना मार्क्सला अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

Translation missing: en.general.search.loading