Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Katmandutil Kardankaal By Ashok Jain
Rs. 0.00

कोलकात्याच्या हॉटेलमधील एका अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा व त्याचे मित्र काठमांडूत त्यांचा जुना शत्रू मगनलाल मेघराजच्या थेट गुहेत जाऊन पोहोचतात. स्वयंभूनाथ येथे घडलेली एक घटना, प्रार्थनाचक्रांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यावर आकस्मिक छापा, कॅसिनोतील एक थरारक रात्र आणि एलएसडीमुळे जटायूंची झालेली घनचक्कर अवस्था या सर्व गोष्टींमुळे हे साहस भलतंच रंजक, रोचक व रोमहर्षक होऊन जातं. अखेर सनसनाटी उत्कर्षबिंदूच्या वेळी चलाख फेलूदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणून पुन्हा एकवार यशस्वी होतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे शेवटचे पुस्तक.

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading