‘‘पापाजी, आर्किटेक्ट घराचा नकाशा देतो. कॉन्ट्रॅक्टर घर बांधून देतो. पण राहतो कोण? घर पुरं झालं की, समोर पडलेली वाळू, चुना, सिमेंट, विटांचे तुकडे यांचे ढीग फेकून द्यावे लागतात. त्या घरात कॉन्ट्रॅक्टर राहत नसतो. ज्याच्याठायी घराचं घरपण टिकवण्याची हौस असते, तोच राहतो. स्वातंत्र्याच्या एका स्वप्नानं आयुष्यभर धावणारे तुम्ही, स्वातंत्र्यानंतर नवीन देश फुलवण्याची कुवत तुमच्यांत नव्हती, हे कधीच तुमच्या ध्यानात आलं नाही. स्वप्नं जरूर होती. ते साकार करण्याची दृष्टी वा बळ नव्हतं... ‘‘...आजवर जोपासलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला कुणी? एवढ्या वर्षांत फक्त लुटारू, ढोंगी आणि स्वार्थी माणसांनीच स्वातंत्र्याची मजा लुटली....’’ स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणाची परखड समीक्षा करणारं नाटक.