Your cart is empty now.
कवी समर लिखित महाकाव्य
पुरंदरे प्रकाशन’ नवीन वैविध्यपूर्ण विषयांना आणि प्रामुख्याने शिवचरित्राला वाचकांपर्यंत नेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पहिले मराठी, महाकाव्य ‘शिवप्रताप’ हे कवी समर यांनी लिहिलेले आहे. ‘महाकाव्य शिवप्रताप’ ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये :-
🔸 *महाकाव्य शिवप्रतापची* १५ प्रमुख वैशिष्ट्ये
१) आपल्या मराठी भाषेतील वृत्त, छंद पुढे नेण्याच्या हेतूने लिहिलेले काव्य २) छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र गुणगुणत पाठ करता येईल ३) यामध्ये पोवाडे ते अभंग, सर्व वृत्तबद्ध आहेत. चालीत वाचता येतील. ४) कै. दीनानाथ दलाल यांनी काढलेली उत्तमोत्तम चित्रे समाविष्ट आहेत. ५) बाबासाहेब पुरंदरे यांनी ९९व्या वर्षी लिहिलेली प्रस्तावना! ६) एक नव्हे, दोन नव्हे, एकूण एकोणीस वृत्त! मग त्यात तुम्हा आम्हाला ओळखीचे भुजंगप्रयात, राजहंस, चंद्रकांत, पृथ्वी वृत्त...सर्व! ७) ३००० श्लोक! १० खंडकाव्ये मिळून हे एक महाकाव्य निर्माण झाले! ८) शिवचरित्रातले १०० प्रसंग या महाकाव्यात काव्यरूपात वाचता येणार. ९) दुरंगी छपाई. जुने ग्रंथ जसे असायचे, तशी छपाई करण्याचा प्रयत्न. १०) कवी समर यांनी १६व्या वर्षी हे काव्य लिहिले. केवळ ५० दिवसांत. त्यामुळे रचनाही ओघवती झाली. ११) १९ वृत्तातले हे पहिलेच महाकाव्य! इतकी वृत्त एका महाकाव्यात वापरलेली आढळत नाहीत. १२) लहान मुलांनाही कळेल अशी सोपी मराठी भाषा! बालपणीच शिवचरित्र कानावर पडावे यासाठी उपयोगी. १३) महाकाव्य लेखनाचे सर्व नियम पाळून लिहिलेले काव्य. १४) महाकाव्यात अभंगही हवेच, म्हणून अभंगासाठी नवे वृत्त निर्माण केले. अभंगही वृत्तबद्ध. १५) शिवाय, महाकाव्य संपूर्णतः यमकबद्ध आहे. दीर्घकाव्यात सहसा यमक बघितले जात नाही. मात्र हे काव्य पूर्णतः यमकबद्ध.
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!