आजचा हा काळ प्रत्यक्ष युद्धाचा असला-नसला, तरी छोटे-मोठे हल्ले होतंच आहेत आणि आपल्या संरक्षणासाठी त्यांना परतवणारे महामानव आज अवतरणार नाहीयेत हेही सत्य आहे. परंतु, त्यांच्या विचारांचं बोट धरून चालणे ही आजच्या काळची गरज नाहीये का? खरंतर आहे! मग मार्ग कसा पार करायचा याचं उत्तर - नरवीर नेताजी, मृत्युंजय स्वातंत्र्यवीर, एक चिरंतन, लोकोत्तर लोकनेता, विसंगतीशी संगत आणि नियतीशी नाते या सामाजिक आणि वैचारिक विचारांना जाणत, काळाप्रमाणे बदलत, समाजहिताच्या विचारांना सोबत घेत,``वैभवाच्या पाठोपाठ विपत्ती आणि विपत्तीच्या पाठोपाठ वैभव, हा मानवी जीवनातला नियतीचा एक खेळ आहे!’’असं सांगत उघड्या डोळ्यांनी वास्तवाकडे बघायला लावणारी ही यात्रा.. म्हणजेच... ``महापुरुषांची महायात्रा...!’’