कोमलतेत प्रचंड सामथ्र्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात. प्रवाह रुंदावत जातो. आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते, तो तुम्हाला सोडून जातो. प्रत्येक गरजेचं, मागणीचं नातं काळाशी बांधलेलं असतं. मागणी जेवढी मोठी, तितका काळ घालवावा लागतो. बंद दरवाजांची एकजूट झटकन् होते, कारण त्या दारापल्याड भ्याड माणसांची घरं असतात.