पुणे पेशव्यांची राजधानी म्हणून ओळखली जात होती.येथे अठरा कारखाने वसविले गेले. त्यातील तोफखाना हा लष्कराशी निगडीत असा होता.बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा कारखाना थाटला. तो जुना तोफखाना भाम्बुर्ड्यास होता. येथे तोफा ढालण्यास निजाम दरबारातील मुझफरखानास आणले होते. पण मराठेशाहीतील चाकरी सोडून तो गेला. तेव्हा हा सरकारी तोफखाना माधव शिवदेव पानसी यांच्या ताब्यात पेशव्यांनी दिला. या तोफखान्यात तोफा ढाळल्या. बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे तयार केले. पुढे माधवराव पेशव्यांनी शुक्रवार पेठेत तोफखाना बांधून घेतला, तो नवा तोफखाना. या दोन्ही ठिकाणी तोफा तयार होत असत.
तोफखान्याचा हा रंजक इतिहास अनेक पेशवेकालीन कागदपत्रे अभ्यासून मराठ्यांचा तोफखाना या पुस्तकात लेखिका सौ. शामला पानसे यांनी मांडलेला आहे