‘‘... हे सैन्यात होते. घरापासून दूर. पण माझ्या मनात नाही कधी आलं, की हे तिथे दारू पीत असतील, की आणखी काय करत असतील! दिसत होती ती फक्त रणांगणावरची धगधग... रात्रंदिवस काळजी...!’’ पण या जगात स्त्रीवर ‘पतिता’ हा शिक्का बसायला वेळ लागत नाही. एक परीट कुजबुजतो आणि इथले प्रभू रामचंद्र गर्भवती सीतांचा त्याग करतात...! शेवटी एकच खरं, की पायानं अधू असणायांना शस्त्रक्रियेनं बरं करता येतं, हाती काठी देता येते; पण मनानंच कोणी पांगळा होऊ लागला, तर त्याला कोण काय करणार?