Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Physiotherapy: Ek Navi Sanjeevani | फिजिओथेरपी : एक नवी संजीवनी Author: Dr. Jyotsna Nadgauda |डॉ. ज्योत्स्ना नाडगौडा
Rs. 72.00Rs. 80.00

डॉ. सौ. ज्योत्स्ना मंगेश नाडगौडा मुंबईच्या जी. एस. मेडिकल कॉलेज (के. ई. एम.हॉस्पिटल) मधून B.sc (Physical Therapy) ला सर्व प्रथम आल्या. पहिली दहा वर्षे पुण्यात जीवनज्योत मंडळाच्या मतिमंद मुलांच्या शाळेत ऑ. फिजिओथेरपीस्ट म्हणून काम करत होत्या. वाई अक्षर इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षे तिथल्या विशेष शिक्षकांना फिजिओथेरपीचे विषय शिकवायला जात होत्या. आता गेली वीस वर्षे पुण्याच्या डेक्कन जिमखाना भागात स्वत:चे उपचार केंद्र यशस्वीरित्या चालवत आहेत. त्यांची आकाशवाणी पुणे केंद्रावरून भाषणे प्रसारित झालेली आहेत. शिवाय दूरदर्शनवर मुलाखतही झालेली आहे. क्रायोथेरपी म्हणजेच बर्फाच्या उपचारांनी रुग्णांमध्ये उत्तम सुधारणा होते आणि त्या जोडीला व्यायाम, योग्य हालचाली, आहार आणि विश्रांती याचे महत्त्व रुग्णांना पटून त्या शेकडो समाधानी रुग्णांनी त्यांना कृतज्ञतेची लिहिलेली पत्र हीच त्यांची खरी संपत्ती आहे असे, त्या मानतात. शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे रुग्णांच्या शारीरिक तक्रारींकडे पाहताना त्यांच्या मानसिकतेकडेही लक्ष देणे जरुरी असते. असा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून फिजिओथेरपी ही कशी नवी संजीवनी बनू शकते ह्याचे मर्म या पुस्तकात आहे.

Categories:
Translation missing: en.general.search.loading