वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.रोज कुणाचं न कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढता येतं.`तुम्ही आम्हाला ओळखत नाही,पण आम्ही तुम्हाला ओळखतो`.ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही काळात नाही.तसं झालं की आठवतो तो सांताक्लाँझ!पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लाँझ?की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझरबॉक्स पर्यंत पोहचवणारा खाकी वेशातला पोस्टमन सांताक्लाँझ?.हे कोडं सुटत नाही.जाऊ दे!न सुटू दे.संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.सगळेच सांताक्लाँझ.सांताक्लाँझची पाऊल आता आपोआप ऐकू येतात.ती वेळ अचूक समजते.पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही."वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक." हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.रोज कुणाचं न कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढता येतं.`तुम्ही आम्हाला ओळखत नाही,पण आम्ही तुम्हाला ओळखतो`.ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही काळात नाही.तसं झालं की आठवतो तो सांताक्लाँझ!पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लाँझ?की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझरबॉक्स पर्यंत पोहचवणारा खाकी वेशातला पोस्टमन सांताक्लाँझ?.हे कोडं सुटत नाही.जाऊ दे!न सुटू दे.संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.सगळेच सांताक्लाँझ.सांताक्लाँझची पाऊल आता आपोआप ऐकू येतात.ती वेळ अचूक समजते.पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.