Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rujwan |रुजवण Author: Manisha Dixit |मनीषा दीक्षित
Rs. 171.00Rs. 190.00

व्यक्तिचित्रण करताना लेखकाला हा तिढा कायम पडतो. आपल्या जवळच्या माणसांबद्दल लिहायचे - त्यात किती खरे लिहायचे, किती संदिग्ध ठेवायचे?... दुसरा तिढा स्वत:ला केंद्रस्थानी अजिबात येऊ न देता वर्ण्यविषय असलेल्या व्यक्तीविषयी लिहायचे व तिचे उदात्तीकरण न होऊ देता लिहायचे ते कसे?... तिसरा तिढा असा की अगदी अंतरीच्या गूढ गर्भातले नाते ज्याच्याशी आहे, असे माणूस तरी आपल्याला किती कळलेले असते?... अशा सर्व अडथळ्यांना मनीषाने बर्‍यापैकी सांभाळले आहे. एकतर आपण ‘लेखिका’ आहोत असा काही आविर्भाव तिच्याजवळ मुळातच नाही... तिच्या या आविर्भावरहित लेखनाने मनाला निश्‍चित विसावा मिळतो. मनीषाचे सासर, माहेर व आजोळ ही तिन्ही कुटुंबे किती तालेवार होती हे महाराष्ट्रात तरी कोणी कोणाला सांगायला नको. असा समृद्ध वारसा लाभलेली लेखिका त्याबद्दल जागरूक आहे, पण त्यात त्या वारशाचा गवगवा ती कुठे करीत नाही ही एक जमेची बाजू. अगदी सहजगत्या तिने तो नुसता स्वीकारलेलाच नाही तर अंगीभूत करून घेतलेला आहे.

Categories:
Translation missing: en.general.search.loading