Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shiva Leela ( Marathi ) Author : Devi Vanamali
Rs. 203.00Rs. 225.00

शिव हा हिंदू देवदेवतांमध्ये सर्वांत प्राचीन व व्यामिश्र असा देव आहे. अनेक परस्परविरोधी अंगानी त्याचे वर्णन करण्यात आले आहे. तो विनाशकारी आहे आणि कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेला योगीही. शिव महापुराने हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ असून तो स्वतः शिवाने लिहिला आहे, असे म्हणतात. या ग्रंथातून वनमाळी यांनी शिवाची दोन्ही रूपे दाखवणान्या आवश्यक कथा निवडल्या आहेत. या कथांमध्ये शिव त्याच्या स्वैर रानटी रूपामध्ये दिसतो, तसा शांत व कृपाळू रूपामध्येही समोर येतो.

वनमाळी यांनी शिवाचे अनेक अवतार येथे चर्चिले आहेत. तो शंभूनाथ आणि भोळा आहे, त्याचवेळी तो ऋषिमुनींना शास्त्र व तंत्राची शिकवण देणारा दक्षिणामूर्तीही आहे. वनमाळी यांनी शिवाच्या दुर्गा, शक्ती, सती व पार्वती, तसेच त्याची मुले गणेश व कार्तिकेय यांच्याशी असलेल्या नात्याचा शोध घेतला आहे. परिघाबाहेरील असलेल्यांचा शिवाने केलेला स्वीकार विशद करतानाच भुताखेतांनी शिवाचे सेवक बनण्याचे आणि रावणासारख्या दैत्याच्या राजांनी त्याचे भक्त बनण्याचेही स्पष्टीकरण वनमाळी यांनी दिले आहे. गंगा नदीचा उगम, समुद्रमंथन यांसारख्या शिवाविषयीच्या प्रसिद्ध कथांबरोबरच दिव्यांचा उत्सव असलेल्या दीपावली सणाचे मूळ, शिवाने निर्माण केलेल्या वैश्विक दाम्पत्यरूपात शिव-पार्वती आणि शिव-पार्वतीने जगाला शिकवलेले कुंडलिनी शक्तीचे रहस्य इत्यादी कथांचा समावेशही वनमाळी यांनी केला आहे. लेखिकेने शैवपंथीय शिकवणीचा आधार घेत पश्चिमात्य विज्ञान व वैदिक शास्त्र यांच्यातील फरक आणि चेतनेच्या उगमाविषयीचे त्यांचे स्पष्टीकरण आदींचा परामर्श घेतला आहे.

कोपिष्ट आणि शांत अशा शिवाच्या दोन्ही बाजू समोर आणताना शिवाचे रूप हे त्याच्या भक्तांच्या गरजांवर अवलंबून असल्याचे वनमाळी स्पष्ट करतात. त्याची शिकवण समजून घेतल्याने मानवी जीवनातील तुटकपणाकडे आणि सर्व दुःखांच्या मुळाशी असलेल्या मोयेच्या पलीकडे पाहता. येऊ शकते. कारण शिव हाच माया निर्माण करणारा असून तो मायेच्या कक्षेमध्ये येत नाही. गणेश हा सर्व विघ्ने दूर करणारा म्हणून ओळखला जातो, तर शिव हा अश्रू नाहीसे करतो.

Categories:
Translation missing: en.general.search.loading