‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संज्ञा खऱ्या अर्थाने प्रस्थापित करणारे तत्त्वज्ञान म्हणजे- ताओ. ‘ताओ’ चा मूळ अर्थ आहे प्रवाहाबरोबर जाणे. आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला निसर्गाशी एकरूप व्हावे लागेल, त्याच्या प्रवाहाबरोबर जावे लागेल.
ही संकल्पना या पुस्तकात विचाररत्नांच्या रूपाने मांडण्यात आली आहे. या तत्त्वज्ञानाचा उगम चीनमध्ये झाला असला तरीही ते आपल्या भगवत्गीतेतल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या तत्त्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारे आहे, हे वाचताना पदोपदी जाणवते. या विचाररत्नांचे मंथन करताना काही नवीन रत्नं हाती लागतात, तर काही जुनीच रत्नं नव्याने चकाकतात.
जीवनाचे अध्यात्म साध्या, सुरस भाषेत समजावून देणारे प्रभावी पुस्तक.