Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Kille Kandhar va Rashtrakutkalin Shilpvaibhav – किल्ले कंधार व राष्ट्रकूटकालीन शिल्पवैभव BY Dr. Arunchandra S. Pathak
Rs. 288.00Rs. 320.00

 

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन झाडांचेही सामाजिक जीवन असते हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच. पण बोह्ललेबेन यांनी हीच गोष्ट वाचकांसमोर अतिशय सुरेख पध्दतीने मांडली आहे. अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अदभुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पारदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधताना, आजारपणात शुश्रुषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणा‍र्‍या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्‍या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्‍या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते. जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात लेखकांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एल वेगळाच अनुभव मिळेल.

Translation missing: en.general.search.loading