आरोग्यपूर्ण पद्धतीने वजन कमी करण्याचा मार्ग सांगणारे प्रभावी पुस्तक
मधुमेह, हायपरथायरॉडीझम, किडनी आणि यकृतामधील स्टोन आणि जास्तीचं वजन या सर्वांवर एकच उपाय कोणता? जीवनशैली.
ल्युक कुटिन्हो हे ‘द ग्रेट इंडियन डाएट’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत. या पुस्तकाद्वारे ते आपल्याला सांगतात की, जास्तीचं वजन आणि दीर्घकालीन आजारपण यांच्याशी सामना करणार्यांनी जीवनशैलीमध्ये सोपे आणि शाश्वत बदल केले तर त्याच्या सामर्थ्याची आणि प्रभावाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
या पुस्तकाच्या पहिल्या भागात, अशा व्याधी मुळात होतातच का याची कारणे दिली आहेत तर दुसर्या भागात कोणतेही कडक नियम असलेल्या आहाराशिवाय आणि कठीण व्यायामाशिवाय स्वास्थ आणि समाधान मिळवण्यासाठी खूप सोपे आणि अतिशय उपयुक्त असे जीवनशैलीतले 62 बदल सांगितले आहेत. रोज नियमितपणे लिंबूपाणी घेणे किंवा शांत झोप लागण्यासाठी श्वसनाचे पाय व्यायाम करणे हे का आणि कसे के याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व गोष्टी एकत्रितपणे मिळून अवलंबल्यास हीच तुम्ही वजन कमी करण्याची जादुई गोळी ठरेल.