Your cart is empty now.
धनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. ‘‘साहेब, काय करताय? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही? तुमच्या मनात नेमवंâ काय चाललंय?'' एकावर एक प्रश्न... पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार? साहेब हे काय करताहेत? जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा सगळा प्रकार? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले? काय होते त्यात? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती ती कागदपत्रे? धनेश अखेरीस करणारच का बुरखाधा-याचा एन्काउन्टर? का? काय आहे काय हे ?
Added to cart successfully!