Your cart is empty now.
2 महान अवतार श्रीराम आणि श्रीकृष्ण
दोन अवतारांच्या महान लीला
भारतातील दोन महान अवतार – प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या महान लीला या पुस्तकात प्रस्तुत केल्या आहेत. या दोहोंच्या कथा तर आपण सर्वांनीच ऐकल्या, वाचल्या आणि पाहिल्या असतील. मात्र, त्यांचा खरा अर्थ जाणणंही आवश्यक आहे.
या अवतारांद्वारे दर्शवलेली लीला आपल्या आंतरिक गुणांचा विकास करण्याची जणू अप्रतिम संधीच! जी आपल्याला भक्ती आणि जगण्याची कला शिकवते.
जीवनात जेव्हा आपल्याला राम आणि कृष्ण म्हणजेच ‘सत्य अनुभवाचं’ महत्त्व लक्षात येतं, त्याची उणीव भासू लागते, तेव्हा त्याच्या प्राप्तीकरिता अथक प्रयत्न आपल्याकडून सुरू होतात. मग योग्य मार्गदर्शनानुसार आपण आपल्या अंतरंगातील सत्याची ताकद, बळ वाढवू लागतो. विकाररूपी रावण आणि अहंकाररूपी कंस यांच्याशी युद्ध करून त्यांचा पराभव करतो, त्यापासून मुक्त होतो. जीवनात ज्यावेळी सत्याचं पुनरागमन होतं, त्यावेळी आपल्या या देहात दिवाळी, जन्माष्टमी साजरी होऊ लागते. म्हणजेच प्रसन्नता, उत्साह, प्रेम, आनंद, मौन आणि शांतीचा महोत्सव सुरू होतो. तुमचीदेखील हीच अपेक्षा तर नाही ना?
Added to cart successfully!