Your cart is empty now.
प्रार्थना बीज
ईश्वराकडे आपण मदत मागितली असेल तर आपली मदत करण्यासाठी प्रार्थना करून तुम्ही देखील त्याला मदत करा.
प्रार्थनेत खूप शक्ती आहे. प्रार्थना चितेला शीतल तर दगडाला मऊ करू शकते. ती वादळाला शमवू शकते आणि बुडत्या नावेला किनार्यावर आणू शकते. विश्वातील सर्व लोक एकाच स्थानावर, एकाचवेळी एकत्रितपणे दोन मिनिटं प्रार्थना करू लागले तर विश्वयुद्धही रोखली जाऊ शकतात. प्रार्थना जगातील सर्वोच्च शक्ती असून समस्या येण्यापूर्वीच ती माणसाला दिली गेलीय.
विश्वातील सर्वोच्च तरंग म्हणजे विश्वास. या विश्वासामुळेच प्रार्थनेचं फळ मिळतं. आपल्या अंतरंगात तेजविश्वासाची शक्ती असून ती लवकरात लवकर जागृत व्हायला हवी. विश्वासच जेव्हा बीज बनतं तेव्हा आश्चर्य आणि चमत्काराचं भरघोस पीक प्राप्त होतं. आपण ज्यावेळी प्रेम, पैसा, मदत, गरजवंताला वेळ देणं अशी विश्वास बीजं पेराल त्यावेळी आपल्या समस्येचं निराकरणही आश्चर्यकारक रूपात होताना बघाल. ईश्वराची कार्य करण्याची ही पद्धत बघून आपणास अप्रुप होईल. प्रार्थनारूपी विश्वास बीज टाकून प्रत्यक्षात ईश्वराला आपण आपल्या जीवनात कार्य करण्याची परवानगी देतो. ईश्वर जेव्हा कार्य करेल तेव्हा ते चमत्कारापेक्षा कमी असेल का?
पण आपल्या प्रार्थनेत समज नसल्याने जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ कर्मकांड बनून राहते आणि समज असेल तर माणसाचं संपूर्ण जीवनच प्रार्थना-बीज बनू शकतं.
Added to cart successfully!