Your cart is empty now.
Vishnujinchi Khasiyat Shakahari विष्णूजींची खासियत शाकाहारी विष्णू मनोहर Vishnu Manohar
आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत् पशुभिर्नराणाम् ।असे एक संस्कृत सुभाषित आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारही गोष्टी मनुष्य आणि पशू यांच्यामध्ये समान आहेत; पण चार नैसर्गिक बाबींमध्ये आहाराचा प्रथम क्रमांक आहे. प्रायोपवेशन करणारे निग्रही लोक सोडले तर पोटाची भूक कोणालाही टाळता आली नाही. भूक भागविण्यासाठी खाद्यपदार्थांशिवाय काहीही लागत नाही; पण आस्वादाचा आनंद घेण्यासाठी माणसाने भोजनप्रक्रियेत कलाबूत शोधून काढली !खाण्यासाठी जगण्यातील जे सौंदर्य आहे ते अवगत होण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी प्राचीन काळामधील विराटपर्वातील भीम ऊर्फ बल्लवाचार्य यांच्यासारखे, तर अर्वाचीन काळातही पाककलाप्रवीण असे मोजके अन्नदाते आहेत. त्यात संजीव कपूर व विष्णू मनोहर यांची नावं आघाडीवर आहेत. आकाशवाणीवरून ते गृहिणींना सुगरण होण्याचे प्रशिक्षण देतातच; पण स्वतः सुद्धा वेगवेगळ्या खाद्यांवर प्रयोग करून नव्या लज्जतदार पदार्थांची भर आहारात घालत असतात.
Added to cart successfully!