मोठी माणसे कर्तृत्वाने मोठी असतातच; पण त्यांचे विचारही प्रेरणादायी असतात. त्यांचे हेच विचार आपल्याला मार्गदर्शन करतात. सुविचारामुळे मन संस्कारित होते, सकारात्मक विचार करण्याची सवय लागते आणि सदाचारही निर्माण होतो.
प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून प्रत्येकाने योग्य पाऊल उचलायला हवे. त्यासाठी निवडक; पण प्रेरणादायी सुविचारांची साथ मिळाली, तर ती साथ प्रत्येकालाच उपयुक्त ठरते. अशा निवडक सुविचारांचा समावेश असलेले हे पुस्तक विद्यार्थी, तरुण आणि सर्वांनाच उपयुक्त होईल आणि आवडेल, अशी आशा वाटते.
ईश्वर, जीवन, व्यक्तिमत्त्व, यश, कला, कर्तव्य, अज्ञान, राष्ट्र, संस्कृती, क्रोध अशा अनेक विषयांवर यशवंतराव चव्हाण, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद अशा थोर भारतीय व्यक्तिमत्त्वांचे तसेच रुझवेल्ट, शेक्सपिअर, इमर्सन, नेपोलियन बोनापार्ट अशा थोर पाश्चिमात्य व्यक्तींचे सुविचारही प्रस्तुत पुस्तकात आहेत. वाढत्या वयातील मुले, तरुण, पालक, सर्व वयोगटातील सुजाण, जागरूक व्यक्तींना उपयुक्त ठरणाऱ्या निवडक सुविचारांचा हा खजिना संग्रहणीय आहे.