Your cart is empty now.
बंगाली साहित्यात अत्यंत लोकप्रिय झालेल्या शरदिंदु बंद्योपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा' या प्रथमच मराठीत उपलब्ध होत आहेत. श्रीजाता गुहा यांनी मूळ बंगाली कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.व्योमकेश बक्षीच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि खिळवून ठेवणार्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे. मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या, तरी आजही त्यांचा टवटवीतपणा विंâचितसुद्धा कमी झालेला नाही.
व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी' असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. अजित नावाचा त्याचा सहकारी आहे.एका प्रकरणातील रहस्याची उकल करताना व्योमकेशची सत्यवतीशी ओलख होते. पुढे तो तिच्याशी लग्नही करतो.
व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आणि शेरलॉक होम्सची आठवण करून देणारं आहे.
निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!