Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Yogi | योगी  by  AUTHOR :- Baba bhand
Rs. 180.00Rs. 200.00
“श्री कृष्णा महाराजांनी स्वतःची चिता रचून
अग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी ५०१ वा
‘कळसाचा अभंग’ लिहिला आणि नोंद केली ‘माझं
जीवनकार्य संपलं… देवानं मला बोलावलं….’ आणि ते
निघून गेले.
आजच्या वर्तमानात अविश्वसनीय ठरावी अशी ही
घटना आहे. एक पंचविशीतला तरुण जेमतेम दहावी
शिकलेला, कोणताही मानवी गुरू न लाभलेला, अभंग
लिहितो आणि त्यातून जीवनतत्त्वज्ञान सांगतो, ही नवलाईची गोष्ट आहे.
कृष्णाचे अभंग मराठी संतपरंपरेचा प्रवाह विस्तारित करणारे आहेत. खरं बोलणं
आणि वागणं म्हणजे ईश्वराकडं जाणं. लोभ, अहंकार, राग या शत्रूंपासून दूर राहा. गरिबांना लुबाडणाऱ्या ढोंगी बुवा-साधूंपासून सावध व्हा. कर्मकांडात अडकू नका.
श्रम हीच ईश्वरसेवा समजा, हे सगळं ते सांगतात. सामान्य माणसाचं जगणं
आनंददायी व्हावं, हे त्यांच्या अभंगाचं सूत्र आहे.”
“भाविकाचे साधकात रूपांतरण प्रक्रिया दाखविणारी ही कादंबरी विश्वसनीयता
संभाव्यतेच्या अनेकपदरी इंद्रधनूचे संस्मरण देते. आधुनिक जीवनरहाटीतही
आध्यात्मिक वाटचालीचे महत्त्व अधोरेखित करते, भावानुभूतींशी समरसता निर्माण
करते. लोककथांचे, मिथककथांचे सारे सामर्थ्य स्वीकारून श्री कृष्णा महाराजांच्या
आंतरिक भाव-आंदोलनांना हळुवारपणे आणि श्रद्धेने सादर करते.
‘लौकिक आणि अलौकिक, वास्तव आणि कल्पित, इंद्रियगम्य आणि अतिंद्रिय
अनुभूतींच्या सीमारेषांचे अभूतपूर्व संमिश्रण साधणाऱ्या विविध कथनप्रणालींनी
आणि कथनदृष्टिकोनांनी श्री कृष्णा महाराजांच्या लीळांना एका सुंदर-सुबोध
कलाकृतीचे रूप येथे प्राप्त झाले आहे.”
Translation missing: en.general.search.loading