हासणे हा ताणतणाव कमी करण्याचा आणि आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ विनोद मनमुराद हासण्यासाठी मदत करीत असतात.
चिं. वि. जोशी यांनी आपल्या चिमणराव आणि गुंड्याभाऊ या दोन विनोदी पात्रांच्या माध्यमातून लोकांना नेहमी हासवत ठेवलं. त्यांच्या विनोदी साहित्यातील निवडक विनोदांचं हे संकलन.
हे पुस्तक तुमचाही तणाव दूर करून, तुम्हाला खळाळून हासायला भाग पाडील. हासण्याचा निखळ आनंद मिळविण्यासाठी वाचून तर बघा!