Your cart is empty now.
विजय लोणकर पेशाने अभियंता असले तरी लेखन हा त्यांचा प्रेमाचा विषय आहे. त्यांनी कविताही केल्या आहेत. लेखातील उपहास व चटकदार शब्द त्यांच्यातील उत्तम विनोदबुद्धीची साक्ष देतात. गुंडांची बंबई हिंदी, कोकणी, ग्रामीण असे भाषेचे वेगळे वाणही येथे आहेत. मंत्री, शिक्षक, नेते, पोलिस, गुंड, खेळाडू, उद्योगपती, तथाकथित साधू इ. अनेक प्रकारच्या माणसांचे खरे अंतरंग या लेखातून आढळेल. खेळांमध्ये विशेषत: क्रिकेटविषयी ते अगदी समरसून आतल्या गोटातील गॉसिपसह लिहितात. वरकरणी हलके फुलके, विनोद ढंगाने लिहिले असले तरी बातमीचा अर्क सांगतानाच दांभिकतेवर प्रहार करणे ही कसरत सोपी नाही. मराठीत असे कसदार लिहिणार्यांची मोठी परपंरा आहे. लोणकर हे त्याच परंपरेतील आहेत. - शि. द. फडणीस
Added to cart successfully!