Your cart is empty now.
या कादंबरीमध्ये कंपनीचा पेर्सोनेल मॅनेजर कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यातून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची आपल्याला माहिती मिळते.
अधिकारी, कर्मचारी, मालक यांच्यातील गुंतागुंत, कामगारांच्या अपेक्षा, मालकाचे व्यावसायिक यश मिळविण्याची धडपड या सर्वाचा मेळ या कादंबरीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. त्यामुळे ती वाचकाला गुंतवून ठेवते.
- या पुस्तकातून वाचकाला कॉर्पोरेट विश्वाची ओळख होते. तसेच नोकरीमध्ये यश मिळविण्याची जिद्द, ते मिळविल्यानंतरही त्याची क्षणभंगुरता, मालकांची असहाय्यता वाचक अनुभवतो. एकीकडे आरोग्यदायी स्पर्धा म्हणताना दुसऱ्या बाजूला एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरु असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यातून एक व्यापक पट किंवा बुद्धिबळाचा खेळ वाचकाला वाचनाचा वेगळा आंनद देईल.
- लेखकाने सोप्या आणि कामगार व कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या भाषेत ही कादंबरी लिहली आहे. त्यामुळे वाचकाला ती गुंतवून ठेवते. ही कादंबरी चित्र रूपाने वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.
लेखक संजय सुखटणकर हे व्यवस्थापन आणि कामगार कायदे या विषयातील तज्ञ आहेत. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात विविध ठिकाणी अधिकारी पदावरकाम केले आहे. ते करत असताना त्यांना अनेक अनुभव आले. ते त्यांनी कादंबरीच्या रूपाने लिहिले आहेत. त्यांनी यापूर्वी लिहिलेल्या कामगार कायदे या पुस्तकाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.
Added to cart successfully!