Your cart is empty now.
कथा वाचताना काही वेळा प्रसंग, ठिकाण डोळ्यांसमोर उभं राहतं. यातील सगळ्याच कथा काही ना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे लेखक शशांक देव यांनी यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसते. माणूस आणि निसर्गाचं एक वेगळं नातं असलं तरी काही वेळा माणूस निसर्गाच्या विरुद्ध थोडा जरी वागला तरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात हे काही कथांमधून दिसते. तर काही कथांतून नातेसंबंधावरही प्रकाश टाकला आहे.
कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. खरंतर या आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना आपल्याच बाबतीत घडत आहेत असे सतत वाटत राहते. मानवी जीवनातील सुख-दुःखही मांडण्याचा यात प्रयत्न दिसतो. या कथा वाचताना अस्वस्थ व्हायला होणं आणि विचार करायला भाग पडणं हेच या कथासंग्रहाचे यश आहे.
Added to cart successfully!