सारं जग हाच एक समुद्र आहे. प्रत्येकाच्या हातात जाळं आहे. तरंगत्या लाटेवर तोल सावरत जाळं फेकावं लागतं. फार सावधगिरी बाळगणारे किनायालगतच जाळी टाकतात. सदैव दिसणारा किनारा आणि चिमुकल्या जाळ्यांत गावणाया चिंगळ्या यावरच त्यांची तृप्ती होते; पण काही धीराचे असतात. त्यांचं स्वप्न मोठं असतं. उधाण वाNयाशी खेळत भर समुद्रात ते जातात, वादळ वायाशी झुंजतात. त्यांना सोन्याच्या मोलाचे मासे सापडतात.... ...चोयामाया करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील.... झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणाया तरुणाईची कैफियत... धन अपुरे!