शास्त्रीबुवा, धन्य तुम्ही. सत्तेच्या लोभापायी आप्तस्वकीयांचे मुडदे पाडावेत, हे मुगलांचं दुव्र्यसन. त्याचा हा कलंक मराठी दौलतीला लागला आणि उभी दौलत मनात कासावीस झाली; पण या भूमीत हे खपवून घेतलं जाणार नाही, असं निर्धारानं बजावणारा एक तरी नि:स्पृह कर्मयोगी निघाला म्हणून या मसनदीची, या उभ्या मराठी दौलतीची आज बूज राहिली. गादीला मुजरा करण्यासाठी म्यानाबाहेर पडलेल्या तलवारी आज मानाचा पहिला मुजरा तुम्हालाच करतील.... रामशास्त्रींच्या परखड न्यायत्वाचे दर्शन घडविणारे नाटक.