1948 साली आलेल्या कूळ कायद्यानं शेकडो वर्षं अबाधित असणाऱ्या ग्रामीण संस्कृतीला जबरदस्त हादरा बसला जमिनीच्या आसर्याने जीवन जगणारे सारे समाजथर या कायद्याने बदलले. इनामदार, छोटे शेतकरी, बारा बलुतेदार, देवस्थानं, वतनदार सर्वांनाच आपल्या जमिनीला मुकावं लागलं. अगदी शहरात मोल मजुरी करून गावाकडं जमिनी विकत घेतलेल्या मजुरांनीही जमीन कुळांच्या हाती सुपूर्द केली. याचवेळी समाज जीवनात नवी स्थित्यंतर घडत होती. नव्या सुधारणा होत होत्या. यांचा सर्वांत मोठा परिणाम झाला तो पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या एकत्र कुटुंबपद्धतीवर या बदलत्या ग्रामीण जीवनाचा, बदलत्या संस्कारांचा वेध घेणाऱ्या या दीर्घकथा ’कातळ!’