एका शहरात हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. ही घटना लेखक रणजित देसाई यांच्या मनाला व्यथित करून गेली. त्यांनी गावोगाव फिरून अशा घडलेल्या घटनांचे तपशील मिळवले आणि त्यातून साकार झाली ’समिधा’... सामाजिक विषमता, जातिवाद यांनी समाज पोखरून टाकला आहे. अनेक निष्पापांचे जीवन यातून उद्ध्वस्त झाले आहे. अशा उद्ध्वस्त मनांची व्यथा मांडणारी कादंबरी ’समिधा.’