चौथ्या आयमाला शोधणाऱ्या आइन्स्टाईन यांचे जीवन बहुआयामी होते; कारण ते न्यूटनच्या समतुल्य वैज्ञानिक होते, ब्रुनो व गॅलिलियो यांच्यासारखे पराक्रमी होते. सरळपणात गांधीजींसारखे होते. यहुदी लोकांचे मसिहा होते, तर श्रीकृष्णासारखे कर्मयोगी होते. त्यांचा एकएक गुण त्यांना महान बनविण्यासाठी पुरेसा होता.
लहानपणी मूर्ख विद्यार्थी असलेल्या या मुलाकडून आई-वडील; तसेच शिक्षकांना कोणत्याच अपेक्षा नव्हत्या.
कौटुंबिक व्यवसाय धुळीस मिळणे, आईवडील जे बनवू इच्छितात ते न बनणे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेरोजगारीच्या दरम्यान अशा घटना घडणे ज्यामुळे चांगल्यात चांगला माणूसही हतबल होतो. यापैकी एक कारणही जीवनाला निराशामय करण्यासाठी खूप झाले असते; पण यातील कोणत्याच कारणामुळे आइन्स्टाईन निराश झाले नाही.
पेटेंट कार्यालयात तृतीय श्रेणीतील कारकुनासारख्या नोकरीपासून प्रारंभ करून आइन्स्टाईनने सैद्धांतिक भौतिकीत धमाकेदार सुरुवात केली.
प्रस्तुत पुस्तकात आइन्स्टाईन यांच्या जीवनातील विविध पैलूंवर तसेच त्यांच्या शोधावर प्रकाश टाकलेला आहे.
आम्हाला विश्वास आहे की, या साधारण व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा वाचकांना रोचक, प्रेरक व उपयोगी ठरेल.