शिक्षण हे प्रगती आणि परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे हे महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ओळखले. त्यांनी प्रजेला उत्तम शिक्षण दिले. सामाजिक सुधारणा, लोकाभिमुख प्रशासन आणि धर्मनिरपेक्ष आधुनिक लोकशाही मूल्यांची सुरुवात केली.
साहित्य, कला, शिल्पकला, संगीत, विज्ञान हे समाजसंस्कृतीचे आधार समजून सर्वांना मदत केली. फुले- शाहू- आंबेडकर, गोखले- रानडे- लो.टिळक- म.गांधी, लजपतराय-अरविंद घोष- पं.मालवीय, महर्षी शिंदे-भाऊराव यासारख्यांना मदत केली.
दुसरी जागतिक धर्म परिषद शिकागो, जा. मानववंश परिषद लंडन, अ.भा. हिंदी साहित्य संमेलन, अ.भा. मराठी संमेलन, जागतिक पाश्चविद्या परिषद आणि अनेक राष्ट्रीय परिषदांचे सयाजीरावांनी अध्यक्षस्थान वेळोवेळी भूषविले.
अशा या विचारवंत राजाचे हे निवडक विचारधन.