Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Prabhavi Bolnyachi 40 Sutre | प्रभावी बोलण्याची 40 सूत्रे  by AUTHOR :- Manwati Arya / Krishna Chandra Arya
Rs. 180.00Rs. 200.00

माणूस आणि प्राण्यातील महत्त्वाचा आणि लक्षणीय फरक म्हणजे माणसाला मिळालेले संवाद साधण्याचे वरदान.
विचारांचे आदानप्रदान आणि भावनांची देवाणघेवाण करण्याची एक अत्यंत उपयुक्त कला म्हणून माणसाने अनादिकाळापासून या सुसंवाद साधण्याच्या कलेचा विकास केला आहे.
इतरांवर आपला प्रभाव टाकण्यासाठी, दुसऱ्याचे गुण प्रकट करण्यासाठी, दुसऱ्याकडून काही शिकण्यासाठी आणि प्रेरणा, प्रोत्साहन मिळविण्यासाठी ही कला खूप उपयुक्त ठरते.
चांगल्या प्रकारे सुसंवाद साधणे, ही एक कला आहे तसेच ते एक शास्त्रही आहे.
सुंसवाद हे शास्त्र असल्यामुळे इतर शास्त्रांप्रमाणे त्यात यश मिळविण्याचे नियमही आहेत.
हे नियम शिकून, माहीत करून घेऊन आणि त्या नियमांची अंमलबजावणी करून कोणीही चांगल्या प्रकारे सुंसवाद साधू शकतो..
आपल्याला काय म्हणायचे आहे, ते नेमकेपणाने, स्पष्ट शब्दांत तसेच अतिशय नम्रपणे आणि सभ्य शब्दांत सांगण्यासाठी सुसंवादाचे शास्त्र अवगत असणे आवश्यक असते; तसेच दुसऱ्याचे म्हणणे योग्य प्रकारे समजून घेण्यासाठीही हे शास्त्र उपयुक्त ठरते.
सुसंवाद साधण्याच्या कलेत प्रवीण असलेले लोक आपले जगणे अधिकाधिक आनंददायी करू शकतात.
जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करण्यासाठी या कलेसारखे उपयुक्त दुसरे काहीच नाही. कुटुंबातील तसेच समाजातील विसंवाद आणि ताणतणावाचे प्रसंग कमी करून, आनंददायक वातावरण निर्माण करण्यासाठी ही कला अतिशय प्रभावी भूमिका बजावीत असते.
सुसंवाद साधण्याचे हे महत्त्व, तसेच ही कला योग्य पद्धतीने आत्मसात करण्याचे शास्त्र या पुस्तकात अतिशय सोप्या आणि सहज समजणाऱ्या पद्धतीने सांगितले आहे. या कलेच्या माध्यमातून प्रत्येकाचे जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे.
एकदा वाचून किमान आपण आपल्याशी तरी सुसंवाद साधायलाच हवा.

Translation missing: en.general.search.loading