Your cart is empty now.
Saat Vishipta Manase सात विक्षिप्त माणसे Roberto Arlt Akshay Kale रॉबेर्तो आर्ल्त अक्षय काळे
“Obra editada en el marco del Programa “Sur” de Apoyo a las Traducciones del Ministerio de Relaciones Exteriores y Culto de la Republic Argentina”अर्जेंटिना प्रजासत्ताकच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या विद्यमाने ‘सूर’ भाषांतर सहाय्य कार्यक्रमांतर्गत रोबेतों आर्ल्स यांच्या कादंबरीचे भाषांतर झाले आहे.
“ह्या नवीन समाजात दोन स्तर असतील. त्यांच्यात अंतर असेल… किंवा नेमके सांगायचे तर तीस शतकांची बौद्धिक पोकळी. त्यांच्यापैकी बहुसंख्य जणांना जाणीवपूर्वक संपूर्ण अज्ञानात ठेवले जाईल. त्यांना भाकड चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातील; कारण त्या ऐतिहासिक कथांपेक्षा जास्त सुरस असतात; आणि मूठभर लोकांच्या हाती विज्ञानाची नाडी असेल आणि ज्यांच्याकडे ताकद असेल. आणि ह्या पद्धतीनेच बहुसंख्य लोकांच्या सुखाची ग्वाही देता येईल, कारण ह्या स्तरातील लोकांचा दैवी जगाशी संपर्क असेल जो आज नाही. हे मूठभर लोक कळपाच्या सुखाचे आणि चमत्कारांचे नियंत्रण करतील, आणि सुवर्णयुगाचे सुद्धा; ज्या सुवर्णयुगात देवदूत तिन्हीसांजेच्या वेळी भटकत असत आणि चंद्रप्रकाशात ईश्वराचे दर्शन होत असे. हे असे होईल.’
Added to cart successfully!