Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shree Tuljabhavani श्री तुळजाभवानी Author: Dr. R. C. Dhere डॉ. रा. चिं. ढेरे
Rs. 899.00Rs. 999.00

श्रीतुळजाभवानी ही महाराष्टाची कुलस्वामिनी आहे . भाग्याविधाती आहे . ती सर्जक आहे . संगोपक आहे आणि संहारकही आहे . महासरस्वती , महालक्ष्मि , आणि महाकाली अशी ती त्रिरुपा आदिशक्ती आहे.

तिचे रूप हे महिषमर्दिनीचे रूप आहे . आपल्या अष्टभुजांत विविध आयुधे धारण करून ती महिषादि असुरांचा संहार करते आणि अथांग वत्सलतेने आपल्या भक्तांचा प्रतिपाळ करते . सप्तशतीत साकारलेले  श्रीतुळजाभवानीचे महिषमर्दिनीरूप जसे ज्ञानदेवांच्या  नितांत श्रद्धेचा विषय बनून राहिले , तसेच ते शिवछत्रपतींच्याही श्रद्धेचा ठाव बनले .

स्वातंत्र्यसमरात परकीय सत्तेंशी झुंज घेताना वीरांना आणि वाडमयकारांना प्रेरणा देणारी ही दिव्या आदिशक्ती त्या काळी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताचीच स्वातंत्रसंजीवनी  ठरली .

या शोधग्रंथात  श्रीतुळजाभवानी या देवतेचा पौराणीक आणि ऐतिहासिक शोध घेत असताना देवितत्वाने भारलेल्या एका प्राचीन मिथकाची प्रेरकता डॉ .रा .चिं.ढेरे यांनी अनेक अंगानी उलघडलेली आहे .

Categories:
Translation missing: en.general.search.loading