Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Navi Googly by Dilip Prabhawalkar
Rs. 108.00Rs. 120.00
आपल्या खेळाची दुनिया अगाध आहे. प्रत्यक्ष मैदानात खेळणारे मूठभर. पण त्याबाबत लिहिणारे, बोलणारे, पैजा लावणारे, अफवा पसरवणारे, अनाहूत सल्ले देणारे, हजारो-लाखो नव्हे, सगळेच. दिलाप प्रभावळकरांची मर्मग्राही लेखणी या सर्वांचा मिस्कील वेध घेते तेव्हा निर्माण होते गुगली. जिच्यात एकच चित्कार हे क्रीडापाक्षिक कष्टपैलू संघाच्या खेळाचा आढावा घेत. ऑडीत बसून माहीममध्ये हिंडणा-या रवी शास्त्रीला लोक धीरूभाई शास्त्री म्हणायला लागतात. एखाद्या चाळकरणीचं मालकाशी पाण्यावरून भांडण झालं, की, मी काही तुमची मांडलिकोव्हा नाहीये असं ठणकावते. सोल ऑलिम्पिकनंतर मराठी रंगभूमीवर पातळमिठी हे नवं नाटक आणण्याचा प्रस्ताव येतो. एखादे आजोबा आपल्या नातवाला बॅटिंगची प्रॅक्टिस देण्यासाठी सटासटा बटाटे टाकतात. रमण लांबा नव्याने उद्योजक झाल्यावर आपल्या हॉटेलमध्ये ‘एक्स्टाकव्हर बॅंक्वेट हॉल’, सिलीपॉईंट मीटिंग रूम उघडतो. सगळे मिळून जगणंच खेळमय करतात. किती न्हाळावं.. किती बघावं..किती टाळ्या द्याव्या-घ्याव्यात असा प्रश्न पडतो. झकासपैकी ‘गुगली’ बघताना तरी वेगळं काय होतं ? 
Translation missing: en.general.search.loading