लेखिकेने मनोगतात म्हटल्याप्रमाणे यातील बरेचसे लिखाण हे त्यांनी फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ या काळात केलेले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जे निर्बंध घातले गेले, त्यामुळे लेखिकेला थोडीशी उसंत आणि मोकळा वेळ मिळाला आणि त्याचे फलित म्हणजे हा कविता - लेख संग्रह.
या पुस्तकातील लेखांचा साधारण विषय हा आयुष्यात आलेल्या या अनुभावांनी गोष्टींकडे आणि जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली असा आहे.
या संग्रहाच्या उचित शीर्षकाप्रमाणे या संग्राहातील बहुतांश लेख हे लेखिकेला आयुष्याच्या प्रवासात आलेल्या मौलिक अनुभवांतून जन्माला आलेले आहेत. यामधील काही लेख हे एखाद्या ठिकाणी केलेल्या निरीक्षणातूनही आलेले आहेत. या लेखांचा साधारण विषय हा आयुष्यात आलेल्या या अनुभावांनी गोष्टींकडे आणि जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली असा आहे.
लेखिकेविषयी : लेखिका कांचन शेंडे या पुण्याच्या असून २०२१ साली त्या नामांकित स.प. महाविद्यालायातून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना गाण्याची विशेष आवड आहे. आपण पाहिलेली प्रत्येक गोष्ट आपली दृष्टी जशी आहे तशी आपल्याला दिसते, यावर लेखिकेचा विश्वास असल्याने, त्यांच्या नजरेतून त्यांनी प्रत्यक्षात आलेले अनुभव या संग्रहात शब्दबद्ध केले आहेत.