Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Nivdak ABKDI निवडक अबकडइ by Satish Kalsekar Arun Shevate सतीश काळसेकर ,अरुण शेवते
Rs. 720.00Rs. 800.00

Nivdak ABKDI निवडक अबकडइ by Satish Kalsekar Arun Shevate सतीश काळसेकर ,अरुण शेवते

चंद्रकांत खोत यांनी १९७३ पासून १९९६ पर्यंत अबकडइ या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन केले. १९७६-७७-७८ या मधल्या तीन वर्षांचे अंक काही कारणाने निघू शकले नाहीत. अशा प्रकारे त्यांनी एकूण २४ वर्षांत २१ दिवाळी अंक प्रसिद्ध केले. आरंभापासूनच चंद्रकांत खोत यांचा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यामागचा हेतू हा कमी व्यावसायिक आणि अधिक प्रयोगशील असल्याचे जाणवत आले आहे. या २१ अंकांत त्यांनी काही दिवाळी विशेषांक हे विशिष्ट विषयांवर केंद्रित केले आहेत. तर काही संकीर्ण म्हणजेच विविध वाङ्मयप्रकार हाताळणारे आहेत. त्यांच्या विशेषांकांचे विषय आत्मकथा, डायरी, पत्र, व्यक्तिचित्र, मुलाखती असे तर आहेतच पण विशेषतः शेवटची चार वर्षे तर्कातीत अनुभव, श्रद्धा : अर्थ- अनर्थ, चमत्कार : सत्यता-असत्यता, पुनर्जन्म अशा काहीशा आध्यात्मिक विषयांचीही मांडणी केली आहे.
अबकडइ दिवाळी अंकाला चंद्रकांत खोत यांनी व्यावसायिक प्रलोभनांपासून सातत्याने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना पटलेल्या भूमिकेचा, आवडलेल्या लेखकांचा आणि सरतेशेवटी त्यांना अपेक्षित असलेल्या वाचकांचा पाठपुरावा करण्यात त्यांनी आपल्या आयुष्याच उमेदीची काही वर्षे घालवली आहेत. त्यातून निष्पन्न झालेल्या गोष्टी आजच्या मराठी वाचकासमोर येणे आम्हाला गरजेचे वाटते.
निवडक अबकडइ या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने आमच्या जवळपास पन्नास वर्षे इतक्या प्रदीर्घ काळातल्या या मित्राच्या कष्टांचा, आतबट्ट्याच्या आर्थिक व्यवहाराचा, स्वतःच्या अटीवर जगण्याच्या निर्धाराचा आणि निखळ साहित्य व्यवहारातल्या समावेशक हस्तक्षेपाचा आम्ही सन्मान करीत आहोत.
– प्रस्तावनेतून

Categories:
Translation missing: en.general.search.loading