आयुष्य, मन, आत्मा, ईश्वर या विषयांशीनिगडित या कविता आहेत. या कविता अत्यंत साध्या सोप्या शब्दात लिहिल्या आहेत. सकाळ प्रकाशनाने आयोजित केलेली ‘एनी वन कॅन पब्लिश’ ही स्पर्धा या लिखाणाला कारणीभूत ठरल्याचे लेखिकेने मनोगतात नमूद केले आहे.
त्यांनीच मनोगतात पुढे म्हटले आहे की, एकंदरीत आयुष्य अनमोल असल्याने निराशेची मरगळ, दुःखाचे वादळ दूर करून आत्मविश्वासाने आनंदाने जगता आले पाहिजे, हा सकारात्मकतेचा संदेश या ऐंशी कवितांच्यासंग्रहातून दिला आहे. या संदेशातून नैराश्येकडे वळलेली काही पावले, सकारात्मक विचारांकडे वळली, तरी मी त्या विधात्याचे आभार मानेन.
लेखिकेविषयी
हा सुचेता अवसरे यांचा पहिलाच कवितासंग्रह असून त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात त्यांना भावलेलं काही, उमगलेलं काही शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न त्यांनी या कवितेतून केला आहे.