सोप्या आणि सहज भाषेत त्यांनी हे लेखन केले आहे. लेखांची नादमय शीर्षके लक्षवेधी आहेत. एकूण २२ लेखांचा हा संग्रह आहे. आयुष्यात भेटून गेलेल्या व्यक्ती, अनुभवलेला प्रवास, जगण्यात आलेले अनुभव त्यांनी टिपले आहेत.
लेखिकेविषयी :
लेखिका पुष्पा तारे, यांची मातृभाषा कानडी असूनही त्यांनी मराठीतून हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजी नाटकातून अभिनयही केला आहे. ‘पीस कोअर’ या अमेरिकेतील संस्थेत त्यांनी अमेरिकन तरुणांना मराठी शिकवले. वाराणसी येथील सेंट जॉन्स हायस्कूल या शाळेत २६ वर्षे शिक्षिका म्हणून काम केले.वाचन आणि लेखनाची विशेष आवड असून त्यांचे लेखन विविध मासिकात, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहे.